PADMASHRI DR. V. B. KOLTE: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ व गुणगौरव सोहळा संपन्न

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
PADMASHRI DR. V. B. KOLTE: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ व गुणगौरव सोहळा संपन्न
PADMASHRI DR. V. B. KOLTE: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ व गुणगौरव सोहळा संपन्न


Malkapur: स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते (PADMASHRI DR. V. B. KOLTE)अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर, येथे विद्यापीठाचा चाळीसवा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ व विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2022- 23 या वर्षामधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी मोठया थाटात संपन्न झाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या, महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना याप्रसंगी पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. ओरिएंटल विद्यापीठ इंदोर येथील कुलगुरू डॉ. सुनील सोमाणी यांची उपस्थिती या सोहळ्याला अध्यक्षपदी लाभली. तसेच याच विद्यापीठाचे संगणक विभागाचे हेड डॉ. शैलेंद्र सिंह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेंद्र पांडे यांची उपस्थिती लाभली. तसेच कोलते महाविद्यालयाचे खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांची देखील या सोहळ्यास उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, विद्यापीठ गीत व दीप प्रज्वलाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी व्यासपीठावरून प्रास्ताविक व स्वागतपर संबोधन केले तसेच सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. सोमाणी सोबतच प्रमुख व विशेष अतिथी यांचे स्वागत शॉल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आले.


महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजेच आज पदके आणि पदवी प्राप्त विद्यार्थी आहेत. त्यांच्या प्रत्येक यशाचा उत्साह साजरा व्हावा आणि इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी महाविद्यालयाचा प्रत्येक घटक झटत असतो. त्या यशाला झळाळी देण्यासाठी महाविद्यालयावर आणि आपल्या विद्यार्थ्यांवर नितांत प्रेम करण्याऱ्या घटकांनी पुरस्कृत केलेल्या पदकांची संख्या अधिकाधिक वाढत आहे याचा आनंद वाटतो, असे कोलते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यावेळी म्हणाले.

 

देशाला महासत्ता बनविण्याची ताकत आजच्या तरुणांमध्ये आहे जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग केल्यास देश निश्चितच महासत्ता बनेल. रोजगाराच्या आज अनेक संधी देशात उपलब्ध आहेत त्यासाठी आपल्यात गुणवत्ता असायला हवी, कौशल्याभिमुख शिक्षणावर भर दिला जावा, मानवी मूल्यांची जपणूक करून चिकित्सक व्हा, विविध कौशल्ये आत्मसात करून आपले जीवन समृद्ध करा, नवीन शैक्षणिक धोरण २०२० अन्वये मूल्य शिक्षणातून कौशल्य विकासाची संकल्पना साकारण्याकरता अथक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी डॉ. सोमाणी व डॉ. सिंह यांनी केले.


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवत्ता धारक गुणवंत विद्यार्थ्यांना पदके व पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये संगणक विभागाची पहिली टॉपर फरिसा फातिमा सय्यद रिजवान, इलेक्ट्रिकल विभागातील पहिली टॉपर योगिता माणिकराव पहुरकर, दुसरी टॉपर धनश्री अशोक धनोकार व तिसरी टॉपर ऋतुजा लक्ष्मण श्रीवास तसेच मेकॅनिकल विभागातील तिसरा टॉपर प्रणव राजेंद्र बराटे यांना पदके व पदवी पत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी इतर सर्व यशस्वी पदविकांक्षींना पदवी वितरित करण्यात आली. पदवीधारक विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.


या सुंदर सोहळ्याचे सूत्रबद्ध संचालन प्रा. मयुरी पाटील यांनी केले. व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या आयक्यूएसी व एनबीए कोऑर्डिनेटर डॉ. बिपासा पात्रा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे प्रमुख प्रा. नितीन खर्चे,संगणक विभागाचे प्रमुख प्रा. सुदेश फरफट, इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख प्रा. योगेश सुशीर, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. संतोष शेकोकार, प्राध्यापिका तेजल खर्चे, प्रा. संदीप खाचणे, प्रा. मनोज वानखेडे, प्रा. सचिन बोरले, प्रा. मो. जावेद, प्रा. मनीष आचेलिया, डॉ. अमोघ माळोकार, प्रा. अमोल हळदे, प्रा. माधुरी राजपूत, प्रा. सदाशिव लवंगे सह इतर प्राध्यापक वर्ग आणि रमाकांत राणे, बलदेव राजपूत सह इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

PADMASHRI DR. V. B. KOLTE

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)